Sudhir Moghe
Sudhir Moghe |
कवी आणि गीतकार म्हणून ओळख असली, तरी सुधीर मोघे यांनी गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा -संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात संचार केला.
मोघे यांचे मूळ गाव सांगलीमधील किर्लोस्करवाडी. ८ फेब्रुवारी १९३९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. किर्लोस्करवाडीतील वातावरण आणि वडील बंधू श्रीकांत मोघे यांच्या रंगभूमीशी असलेल्या नात्यामुळे सुधीर मोघे यांनाही सुरुवातीला रंगभूमीची ओढ होती. मात्र, त्यांच्यात उपजतच कवी गुण होते. त्यामुळे, सत्तरच्या दशकात पुण्यात आल्यानंतर 'स्वरानंद प्रतिष्ठान'च्या माध्यमातून विविध कार्यक्रमातून त्यांच्यातील अष्टपैलुत्व पुढे आले. 'मंतरलेल्या चैत्रबनातून'पासून 'नक्षत्रांचे देणे'पर्यंत अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आगामी 'रमा-माधव' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. 'हा खेळ सावल्यांचा', 'शापित', 'जानकी', 'पुढचं पाऊल', 'आत्मविश्वास', 'कळत-नकळत', 'चौकट राजा', 'देऊळ' यासारख्या पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले.
कविता संग्रह
- आत्मरंग
- गाण्याची वही
- पक्षांचे ठसे
- लय
- शब्द धून
- स्वतंत्रते भगवती
गद्य लेखन
- अनुबंध
- गाणारी वाट
- निरांकुशाची रोजनिशी
गाजलेली निवडक गीते, भावगीते
- रंगुनी रंगात साऱ्या...
- आला आला वारा...
- एक झोका... चुके काळजाचा ठोका...
- गुज ओठांनी ओठांना...
- गोमू संगतीनं माझ्या तू...
- जरा विसावू या वळणावर...
- त्या प्रेमाची शपथ तुला...
- दिस जातील दिस येतील...
- देवा तुला शोधू कुठं...
- फिटे अंधाराचे जाळे...
- भन्नाट रानवारा मस्तीत शीळ...
- विसरू नको श्रीरामा...
- शंभो शंकरा करुणाकरा...
- सखी मंद झाल्या तारका...
- रात्रीस खेळ चाले...
- माय भवानी तुझे लेकरू...
- मी सोडुन सारी लाज...
- मन मनास उमगत नाही...
- सांग तू माझाच ना...
- सांज ये गोकुळी सावळी सावळी...
पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
- सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
- गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
- पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
- पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
- 'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
- 'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
- 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा 'कविवर्य ’ना.घ. देशपांडे' पुरस्कार - २००६
- 'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांता शेळके 'पुरस्कार - हस्ते श्रीमती लता मंगेशकर २००७
- साहित्यकार 'गो. नी. दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
- केशवसुत पुरस्कार २०११
- ’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२)
- सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).
No comments:
Post a Comment